प्रसिद्धीसाठी - 20 फेब्रुवारी 2023
राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठान तर्फे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त्य आणि शिवजयंती निमित्त्य नागपूर शहरात "शिवाजी कोण होता ?" या पुस्तकाच्या 1000 प्रतीचें वाटप
शिवजयंती आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नागपूर शहरात ठिकठिकाणी "शिवाजी कोण होता ?" या पुस्तकांच्या 1000 प्रतीचे वाटप राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले. आजच्या काळात लोकांची वाचण्याची आवड कमी झाली आहे. संपूर्ण देशभरात नव्हे तर जगामध्ये शिवजयंती साजरी होत आहे. आणि म्हणूनच यावर्षीची शिवजयंती फक्त डीजे, नाचगाणे यांच्यापुरतं शिवाजी महाराजांचं कर्तृत्त्व बंधिस्त न करता यावर्षीची शिवजयंती वैचारिक साजरी झाली पाहिजे यासाठीच यावर्षी "शिवाजी कोण होता ?" या पुस्तकाचे वाटप करण्यात आले.
घराघरापर्यंत पुस्तक गेलं पाहिजे अन लहान मुलांना शिवाजी महाराज फक्त अफझलखानाचा कोथळा, शाहिस्तेखानाची बोट आग्र्यातून सुटका या गोष्टींच्या पलीकडे असणारे शिवाजी महाराज लहान मुलानांपासून तर मोठ्यांपर्यंत कळाले पाहिजे. हाच राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठान चा उद्देश आहे. राजकीय अजेंड्याला बळी पडलेला तरुण सोशल मीडिया युनिव्हर्सिटी मधून आलेले संदेश वाचून पोकळ धर्माभिमानाच्या बाता मारत असताना देशाची खरी परिस्थिती नेमकी काय याबाबतीत अनभिज्ञ आहे. आणि म्हणून सती प्रथा बंद करून सामाजिक क्रांती करणारे, रयतेच्या देठाला सुद्धा हात लावता काम नये असा आदेश देणारे व प्रत्येक काम पारदर्शपणे होण्यासाठी आग्रही असणारे, लढाई करताना व दुष्काळात शेतकऱ्यांना पाठबळ देणारे कर्तव्यदक्ष प्रशासन सांभाळणारे महाराज, किल्ल्यांच्या परिसरात वृक्षलागवड करून त्यांच्या तोडण्यावर बंदी घालणारे निसर्गप्रेमी महाराज, कोणत्याही लढाईसाठी मुहूर्त न शोधता यशस्वी करून अंधश्रद्धा निर्मूलन करणारे शिवराय, जबरदस्त जलव्यवस्थापन करणारे शिवराय, किल्ले बांधून संवर्धन करणारं उत्तम अभियंते, रांझ्याच्या पाटलाने केलेल्या बलात्कारासाठी हातपाय कलम करा आदेश देऊन लोकांसाठी समान न्याय आणि सन्मान देणारा राजा, अष्टप्रधान मंडळ स्थापन करून लोकशाही रुजवणारा पहिला राजा, कमी संसाधने वापरून कमी जीवाची हानी करून स्वराज्य उभं करणारा मॅनेजमेंट गुरु असणारे शिवाजी महाराज तरूणांपर्यंत पोहोचले पाहिजे हि आजच्या काळाची गरज आहे. आणि म्हणून अशी पुस्तक वाटून वैचारिक शिवजयंती साजरी करण्याचं आवाहन राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठान तर्फे करण्यात आलं होत.
येणाऱ्या काळात महापुरुषांचा इतिहास तरुणाईच्या मनामनात पोहोचवण्यासाठी प्रतिष्ठान काम करत राहील. असे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष वैभव शिंदे पाटील यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी नागपूरमधील संभाजी ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, छत्रपती चौक ऑटो संघटना यांचे विशेष सहकार्य लाभले. पुस्तक वाटपाची जबाबदारी अनुप मुरतकर, हर्ष मते, विपुल लोखंडे, अमित बांदूरकर, मयूर हिंगणे, निखिल खुरसनकर, निखिलेश जौंजलकर यांनी सांभाळली व यशस्वी केली.