#autofarm
ग्रामीण भागात , शेतातील पाण्याचे नियोजन करताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. विजेची रात्री अपरात्री उपलब्धता आणि पाण्याच्या अयोग्य नियोजनामुळे पिकांचे होणारे नुकसान याला कंटाळून प्रगतशील शेतकरी ऑटोफार्म हे जागतिक दर्जाचे संपूर्ण भारतीय बनावटीचे तंत्रज्ञान आपल्या शेतात बसवत आहेंत . अत्यल्प खर्चात बसवलेल्या या तंत्रज्ञानामुळे होत असलेला फायदा , कमी झालेला त्रास आणि पिकांची झालेली भरभराट याबद्दल त्यांची मते अवश्य ऐका .
ऑटोफार्म हा एक IOT प्लॅटफॉर्म आहे. जो स्मार्ट सिंचन व्हॉल्व्ह , पंप , माती व हवामानाचे सेन्सर्स तसेच फेर्टीगेशन ऑटोमेशन अतिशय सोप्पे आणि अधिक कार्यकक्षम बनवते. तुम्ही कधीही , कुठूनही मोबाईलअँप वापरून शेतीचे व्यवस्थापन आणि नियंत्रण करू शकता . हे तंत्रज्ञान तुम्हाला माहितीच्या आधारे निर्णय घेणे शक्य करते त्यामुळे उत्पादन आणि गुणवत्ता वाढून पाणी , खत यांचा अति आणि अयोग्य वापर कमी होऊन खर्चात बचत होते.ऑटोफार्म प्रणाली सौर उर्जेवर चालणारी आणि वायरलेस आहे. या प्रणालीमध्ये सेन्सर आधारित किंवा वेळेवर आधारित सिंचन व खत वेळापत्रक नियंत्रणाचे पर्याय उपलब्ध आहेत.
#farming
#farmer
#indianfarmer
#farmautomation
#automation
#futurefarming #indianfarmer #grapefarming #farming #shetimahiti #shetimitra